यशवंत पंचायतराज राज्य समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी समितीकडून कामांची प्रशंसा..!
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या वतीने यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत पुरस्कारासाठी राज्यस्तरीय तपासणी समिती कडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी करणेत आली.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आज यशवंत पंचायत राज समिती जिल्हा परिषदेने सादर केलेले प्रस्तावा नुसार तपासणी केली. सन 22-23 अंतर्गत सखोल तपासणी केली. रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, रायगड जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालक प्रियंदर्शनी मोरे यांनी सर्व प्रस्तावातील बाबींची तपासणी केली. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी(प्रशासन) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वाकडे -ठोके, यांचे सह विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी उप मुख्य कार्यकारी अधिकारी(प्रशासन) स्मिता पाटील यांनी प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांचे स्वागत केले तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बडे यांचे स्वागत कार्यकारी अधियंता संतोष कुलकर्णी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी शासनाने दिलेले उदिष्ठ्य पुर्ण करणे बरोबरच विविध नाविण्यपुर्ण योजना राबविणेत आलेले आहेत. त्याचे सादरीकरण व विविध पुरस्कार प्राप्त झालेली माहिती समिती समोर सादर करणेत आली. जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सादरीकरण केले.
देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करून राज्यात सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटाकविला आहे. प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामा बाबत समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषेदेच्या फेसबुक, सोशल मिडिया अंतर्गत कामाचे समितीने कौतुक केले. सिईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांचे मार्गदर्शना खाली विभाग प्रमुख उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत मिरगणे, शिक्षणाधिकारी शेख, कार्यकारी अभियंता खरात, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी , अधिक्षक अनिल जगताप, कक्ष अधिकारी सचिन साळुंखे, अधिक्षक स्वामी , कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, कक्ष अधिकारी झेड ए शेख, कक्ष अधिकारी सचिन सोनकांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या साठी नियोजन करून माहिती सादर केली. सुत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले. जिल्हा परिषदेतील सर्व कक्ष अधिकारी अधीक्षक व कर्मचारी यांनी यासाठी मेहनत घेतली.
सोलापूर जिल्हा परिषदेत एकजुटीचे दर्शन - अतिरिक्त सिईओ बडे
……………..
सोलापूर जिल्हा परिषदेने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. नुसार राज्य स्तरीय पुरस्कारासाठी सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी करणेत आली आहे. सोलापूर जिल्हा परिषद विविध पुरस्कारामुळे राज्य स्तरावर नाव होत आहे. ही खुप समाधानाची बाब आहे. या निमित्ताने सर्व माहिती सागर करताना सर्व विभागाची एकजुट दिसून आली असल्याचे समिती प्रमुख सत्यजित बडे यांनी सांगितले.

0 Comments