विद्या लोळगे यांनी पक्ष श्रेष्ठींकडून स्वीकारला मुंबईत माजी महापौर महेश कोठे यांचा AB फॉर्म…
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर उत्तर मतदार संघाकडे सोलापूर जिल्हा सह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शहर उत्तर मधून माजी पालकमंत्र्यासह अनेक इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी {शरद पवार} गटाकडून माजी महापौर महेश कोठे यांनी तुतारी हाती घेत शहर उत्तर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. तशी जोरदार तयार पूर्वी पासूनच कोठे समर्थकांनी केली आहे.महेश कोठे यांनी प्रत्यक्ष भेटी – गाठी वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. “गुरूपुषामृत” दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोळगे यांनी आज मुंबईत पक्षश्रेष्ठीकडून महेश कोठे यांचा AB फॉर्म स्वीकारला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व जयंत पाटील हे शहर उत्तर वर गेल्या कित्येक दिवसांपासून विशेष लक्ष ठेवून होते.आणि माजी पालकमंत्र्यां विरोधात महेश कोठे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याची यापूर्वी जाहीर केलं होत.
0 Comments