डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी
25 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर (कटूसत्य):- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार देण्यात येतो. यासाठी 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे. सन 2023-24 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 26 ऑगस्ट 2024 ते 25 सप्टेंबर 2024 पर्यंत तीन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावे.राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ भेट आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येते. तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार तसेच राज्यातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ भेट आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस झुआरी सिमेंट कंपनीकडून चार संगणक भेट
सोलापूर (कटूसत्य):- सोलापूरातील नामवंत झुआरी सिमेंट लिमीटेड कंपनीकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड सोलापूर येथील संस्थेस कंपनीच्या सी.एस.आर फंडातून शैक्षणिक विकास उद्देशांतर्गत अद्यावत चार संगणक भेट दिले असल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन धुमाळ यांनी दिली.यावेळी झुआरी सिमेंट लिमीटेड कंपनीचे प्लॅट हेड सुनील कक्कर, सिनियर एच.आर शिवजी चौगुले,सहाय्यक एच.आर मॅनेजर अमोल जाधव , औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सचिन धुमाळ, उपप्राचार्य सुरेश भालचिम व ॲप्रेटीस विभागाचे भिमाशंकर कोंडगुळी उपस्थित होते.आपली सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी लक्षात घेऊन कंपनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर प्रशिक्षणार्थ्यांसाठी नेहमी मतद करेल असे प्लॅट हेड सुनील कक्कर यांनी सांगितले. तसेच कंपनीला इलेक्ट्रीशियन, जोडारी, मेसन, संधाता, तारतंत्री इत्यादी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारीसाठी कंपनीकडे पाठवावे असे आवाहन सिनियर एच.आर. शिवाजी चौगुले यांनी केले. यावेही बोलताना संस्थेचे प्राचार्य धुमाळ यांनी कंपनीच्या सीएचआर फंडातून प्रशिक्षणार्थ्यांसाठी संगणक लॅब द्यावी अशी विनंती संस्थेतर्फे यावेळी केली.या कार्यक्रमाचे आभार.बसवराज मोटे यांनी मानले तर सुत्रसंचलन प्रविण केंदळे यांनी केले सदर कार्यक्रमास संस्थेतील सर्व गटनिर्देशक, निर्देशक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments