मच्छिंद्र गावडे गुरुजी यांचे निधन
कुरुल (कटूसत्य वृत्त ):- पुळूज ता.पंढरपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक मच्छिंद्र आप्पा गावडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षाचे होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वानुसार खरसोळी, पुळूज, शारदानगर येथे शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवून आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त केले आहेत. शिवाय एक मुलगी व दोन मुलांना डॉक्टर तर सुनेला तहसीलदार पदापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले. रणजितसिंह मोहिते-पाटील सार्वजनिक वाचनालयाचे ते अध्यक्ष तर स्व. विठ्ठलराव विखे-पाटील रुलर फाउंडेशनचे सचिव म्हणून काम पाहत होते.
स्व. विठ्ठलराव विखे पाटील रोलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांचे ते वडील तर तहसीलदार शोभा पुजारी गावडे यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments