मंद्रुप येथे विविध मागण्यां संदर्भात उबाठा शिवसेनाचा रास्ता रोको... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 10, 2024

मंद्रुप येथे विविध मागण्यां संदर्भात उबाठा शिवसेनाचा रास्ता रोको...

 मंद्रुप येथे विविध मागण्यां संदर्भात उबाठा शिवसेनाचा रास्ता रोको..


सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा वतीने मंद्रुप तहसील कार्यालय समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मंद्रूप येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या समोर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलेशेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही गाईच्या दुधाला 40 आणि म्हशीच्या दुधाला 70 प्रति लिटर भाव मिळावे,

शेतकऱ्यांना तात्काळ दूष्काळ निधी मिळावी,

शेतकऱ्यांना सिव्हिल चेक न करता बॅंकेने कर्ज पुरवठा करावा, शेतकऱ्यांचे प्रलंबित पिक विमा तात्काळ मिळावे,मराठा लिंगायत धनगर मुस्लिम आणि कोळी  समाजाचा आरक्षण तिढा सोडवावा या आधी मागण्यांसंदर्भात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आदी मागण्यांचे निवेदन मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे निवेदन देण्यात आले या संपूर्ण आंदोलन संदर्भात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील  संतोष पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा प्रियाताई बसवंती यांनी अधिक माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली 

यावेळेस उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील महिला जिल्हाध्यक्षा प्रियाताई बसवंती, जिल्हा उपप्रमुख धर्मा बगले, संतोष पाटील, शहरप्रमुख शरणराज केंगनाळकर, युवासेना प्रमुख बालाजी चौगुले योगीराज पाटील,महालिंगप्पा बिराजदार,निंगराज हुळ्ळे,शरणु दुधभाते, शिवशंकर सोन्ने, ज्योती चव्हाण,लता राठोड, संदिप मेंडगुदले, संतोष बरुरे,उस्मान नदाफ,सिध्दाराम काळे, आनंद थोरात अनिल स्वामी, सुरेश शेंडगे राजु कोळी, चंद्रकांत गुड्डेवाडी,बिराप्पा वरवटे राजकुमार कुलकर्णी संतोष घोडके, यांच्यासह उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages