मोहोळ शहरात शनिवारी (दि. २७) कडकडीत बंद
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अनगर येथे नव्यानेच मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या या निर्णयाविरोधात मोहोळ शहरात शनिवारी (दि. २७) कडकडीत बंद पाळण्यात आला.शासकीय विश्रामगृहावर झालेल्यासर्वपक्षीय बैठकीत अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीचा आदेश रद्द होईपर्यंत माजी आमदार राजन पाटील आणि आ.यशवंत माने यांना प्रत्येक गावात प्रवेश बंदी करण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला.कोणत्याही गावाची मागणी नसताना आणि मोहोळ येथील तहसील कार्यालयावर कामाचा कोणताही ताण नसताना अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केल्याचा आदेश आल्यानंतर तालुक्यात संतापजनक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. अनगर येथील अप्पर कार्यालयामुळे मोहोळ शहराचे महत्व आपसूकच कमी होणार आहे. त्यातच मोहोळ शहरातील जनतेने नेहमीच राजन पाटील यांना विरोध केला असून शिवाय त्यांना कधीही राजकीय साथ दिली नाही. त्यामुळे या शहरातील जनतेबद्दल त्यांच्या मनात मोठा आकस आहे. या आकसापोटी या भागातील जनतेने आपल्या समोर नाक घासले पाहिजे या भावनेतून या कार्यालयाचा घाट घातला आहे, अशा प्रतिक्रिया सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.शेटफळ, पेनूर आणि नरखेड या गावातील नागरिकांना मोहोळ शहरात जाण्यायेण्यासाठी दळणवळणाची मोठी सोय आहे. मात्र, अनगरला जाने-येने या गावातील नागरिकांसाठी जिकरीचे बनणार आहे. असे असतानाही या गावातील ग्रामस्थांनी आपल्याच गावात शासकीय कामासाठी यावे यामागे राजकीय सूड उगविण्याचा राजन पाटील यांचा हेतू असल्याचेही या बैठकीत नेत्यांनी बोलून दाखविले.
या बैठकीला जेष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे, दीपक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मानाजी माने, माजी सभापती विजयराज डोंगरे,प्रदेश सदस्य संतोष पाटील, संजय क्षीरसागर, उद्योजक राजाभाऊ खरे,रमेश बारसकर, अॅड. पवन गायकवाड,पद्माकर देशमुख, महेश देशमुख, विक्रम देशमुख, चरणराज चवरे, बाळासाहेब गायकवाड, सिमाताई पाटील,काका देशमुख, विनय पाटील, सतीश पाटील,भीमराव वसेकर, किशोर पवार,सोमेश क्षीरसागर, दादासाहेब पवार,सुनील चव्हाण, सुशील क्षीरसागर,सतीश काळे, अशोक भोसले, अंकुश आवताडे, आदी उपस्थित होते.मोहोळ तहसील कार्यालयाचे कारण आणि मागणी नसताना विभाजन केल्याने शहराच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाचे विभाजन केल्याने शहराच्या अर्थकारणावर अगोदरच परिणाम झाला आहे. त्यातच पुन्हा अप्पर कार्यालयाचा प्रयोग झाल्याचा मुद्दा उपस्थित करून शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी मोहोळ बंदचे आव्हान करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.
.jpg)
No comments:
Post a Comment