बागलवस्ती शाळेच्या बाल दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश
बारलोणी(कटूसत्यवृत्त):-बारलोणीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागलवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची बाल दिंडी आयोजित करण्यात आली होती. यावेळी या दिंडीत संत तुकाराम महाराज व त्यांची पत्नी जिजाई ऊर्फ आवली यांची वेशभूषा आगळी वेगळी ठरली. राघव देशमुख या विद्यार्थ्यांने संत तुकाराम महाराज यांची व ईश्वरी घोडके या विद्यार्थीनीने संत तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाई ऊर्फ आवली यांची वेशभूषा परिधान केली होती.यावेळी संत तुकाराम महाराज यांच्या "वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें,पक्षीही सुस्वरें आळविती" या अंभगातून दिलेला वृक्षारोपण वृक्षसंवर्धनाचा संदेश या बालदिंडी तून देण्यात आला. यावेळी बाल वारकऱ्यांनी विविध पथनाट्ये व गीते सादर करून झाडे लावा, झाडे जगवा, हिरवे व्हा, स्वच्छ श्वास घ्या, पर्यावरण प्रदूषित करणे थांबवा,सुंदर भविष्यासाठी निसर्गाचे संगोपन करूया.उत्तम वातावरण उत्तम उद्या,प्रदुषण थांबवा पृथ्वी ग्रह वाचवा,वापरा,रिसायकल करा,पुन्हा वापरा, पृथ्वी वाचवा, स्वतःला वाचवा असा पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी राघव देशमुख, ईश्वरी घोडके, मयुरी बागल, आरव गोरे, शोर्य बागल, पवन बागल, हर्ष मोरे, अश्विनी बागल, आदर्श लोंढे, संकेत ढेरे, समर्थ बागल, पुजा बागल, पृथ्वीराज गवळी, आदिती लोंढे, अनुष्का बागल,राम मोरे, यशराज लोंढे या विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होत्या.शिवराज बागल, आदेश बागल,संदेश बागल यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या बालदिंडीत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश बागल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बागल, प्रशांत बागल, शशिकांत गोरे,संतोष सरडे, काकासाहेब लोंढे, केंद्रप्रमुख संजीवनी पौळ-उबाळे, शाळेचे मुख्याध्यापक निलेश देशमुख, सहशिक्षका सुजाता वाघ, अंगणवाडी सेविका सुनिता बागल, उमा बागल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments