लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात कवी कालिदास दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी महाकवी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय व लोकमंगल कृषीव्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप आदलिंगे हे अध्यक्षस्थानी होते .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे हे लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर कविता व मनोगत सादर केले. यामध्ये दक्षता देशमुख, नक्षत्रा कांबळे, सोनाली उन्हाळे, धम्मेश गवळी, रामेश्वरी महामुनी यांचा समावेश होता. यानंतर प्रा. गणेश जाधव यांनी विविध विषयांवर कवीता सादर केल्या. त्यांच्या कवितांचा सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने मनापासून आस्वाद घेतला. त्यानंतर प्राचार्य डॉ सचिन फुगे यांनी कवी कालिदास यांच्या काव्याबद्दल व लिखाणाबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहित सांगितली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध कलागुण जोपासले पाहिजेत.या दिनाचे महत्त्व पटवून सांगताना प्राचार्य प्रदीप आदलिंगे म्हणाले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीवनात प्रत्येक पायरीवर व्यक्त होणे महत्त्वाचे आहे व त्यासाठी काव्य हा उत्तम पर्याय आहे. काव्याचे विविध प्रकार आहेत व काव्य करण्यासाठी आपल्यात कल्पकता, दृष्टीकोन, भावना, जाणीव तसेच सुसंस्कृतपणा असणे आवश्यक आहे असे मनोगत प्राचार्य प्रदीप आदलिंगे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रसाद नेटके व आभारप्रदर्शन विद्यार्थीनी प्रज्ञा मंद्रूपकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रा. सागर महाजन, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. पुनम उंबरे, प्रा. मंजुश्री डोंगरे, प्रा. स्मिता धायगुडे, प्रा निशा काटे तसेच लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment