शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) रस्त्याच्या मागणीला यश 2 कोटी 8 लक्ष एवढा निधी मंजूर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 8, 2024

शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) रस्त्याच्या मागणीला यश 2 कोटी 8 लक्ष एवढा निधी मंजूर

 शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) रस्त्याच्या मागणीला यश 2 कोटी 8 लक्ष एवढा निधी मंजूर


शिरूर (कटूसत्यवृत्त):-शिरूर तालुक्यातील शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) या रस्त्यासाठी राज्याचे सहकामंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी २ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिली आहे.

   अनेक वर्षांपासून महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता म्हणून या रस्त्याकडे पाहिले जात होते या कामासाठी अनेक तेथील स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केली होती रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये येण्या जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो     शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी 

या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सहकार मंत्री वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी शिंगाडवाडी ते चिंचोली मोराची (शास्ताबाद) या रस्त्याच्या कामासाठी तब्बल २ कोटी ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिला.

       सदर रस्ता हा पारदर्शक व अधिक मजबूत व चांगल्या पद्धतीचा करता येईल व तेथील अडीअडचणी दूर करून भविष्यात हा रस्ता अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न राहील आज रस्त्याची पाहणी करताना आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंगभैय्या पाचुंदकर, वरूडे गावचे आदर्श सरपंच संतोष भरणे तसेच शिंगाडवाडीचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष शालेयशिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य आजी-माजी सैनिक स्थानिक ग्रामस्थ विविध पक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 


 मानसिंग पाचुंदकर  आंबेगाव शिरूर मतदार संघातील उर्वरित कामांसाठी प्रयत्नशील राहणार  प्रत्येक गावातील छोट्या छोट्या समस्या सोडवून लवकर निराकारन करणार  सहकार मंत्री वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामांना गती देऊन ती लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार  दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाच्या असणारे छोटे-मोठे सर्व रस्ते एकत्रित जोडून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहणार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages