Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती



मुंबई (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसंचं आगमन झालं आहे. कोकणातील रत्नागिरीनंतर सोलापूर तसंच पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालची खाडी असा पाऊस सुरु झाला आहे.

हवामान तज्ञ्ज के. एस. होसाळीकर यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) दक्षिण आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. याचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसताना दिसत आहे 

Reactions

Post a Comment

0 Comments