Hot Posts

6/recent/ticker-posts

“सोलापूरचा ऐतिहासिक वारसा” या विषयावर सचित्र व्याख्यान

  “सोलापूरचा ऐतिहासिक वारसा” या विषयावर सचित्र व्याख्यान 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर शाखेच्या मासिक सभेत डॅा सीमंतिनी चाफळकर यांचे “सोलापूरचा ऐतिहासिक वारसा” या विषयावर सचित्र व्याख्यान झाले. अध्यक्षा प्रणिता महिंद्रकर, सचिव  विशाल खमितकर, सदस्य शिवाजी उपरे यांनी व्याख्यानाचे आयोजन केले.  डॅा चाफळकर यांनी ऐतिहासिक वारसा म्हणजे काय, त्याचे प्रकार व सोलापूरचा कला व सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक वारसा, तसेच वास्तुरूपातील वारसा किती संपन्न आहे याची चर्चा केली. त्यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील वारसा वास्तुंचे वर्णन केले तसेच त्यांच्या जतन व संवर्धनाची आवश्यकता का आहे ते सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी इंटॅकच्या कार्यांचे स्वरूप, व शहरातील वास्तुंच्या दस्तावेजीकरण व संवर्धनातील इंटॅकचे योगदान  विशद केले. तसेच भावसार समाजाचे आधुनिक सोलापूरच्या जडणघडणीतील योगदानाचे वर्णन केले  व आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमास अनेक सदस्य सहकुंटुंब उपस्थित होते व काही सदस्यांनी प्रश्नही विचारले.

Reactions

Post a Comment

0 Comments