शिंदे फडवणीस पवार सरकार लोकसभा जागा वाटपात व्यस्त जगाचा पोशिंदा शेतकरी राजा लाईट मुळे त्रास्त : गणेश इंगळे .
माळशिरस (कटूसत्य वृत्त):-भिमा नदी काठावरील शेती पंपाची लाईट ही गेली अनेक दिवस झाले जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य विधुत महावितरण कंपनीने 4 तास केली आहे .त्यामुळे शेतकरी अधीच दुष्काळामुळे मेटाकुटीस आला आहे .आणी आता लाईट 4 तास केल्यामुळे आहे हे ही शेतातील पिके जळून जाऊन शेकऱ्यांन समोर आत्महत्या करण्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. आपल्या कृषि प्रधान देशात शेतकऱ्यांची लाईट बंद करून जर शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रशासन प्रवृत्त करित असेल तर ह्या हून दुर्दव्याची गोष्ट नाही.भिमा नदी काठावर माळशिरस तालुक्यात कोणत्याही प्रकारचे पाणी पुरवठा योजना नाहीत किंवा दुष्काळ साठी कोणत्याही प्रकारचे पाण्याचे ट्यान्कर चालू नाहीत .त्यामुळे भिमा नदी मध्ये जे शिल्लक राहणारे पाणी हे भाष्पीभवन ने उडून जाऊ शकते त्यामुळे कमीत कमी ते पाणी शेतकऱ्यांच्या उपयोगी तरी यावे साठी भिमा नदी काठ तात्काळ 8 तास किंवा शक्य नसेल तर कमीत कमी 6 तास तरी विधुत पंपाची लाईट चालू करावी अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे . सद्या लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे .या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांना जगाचा पोशिंदा शेतकरी राजाकडे बघण्यास थोडा देखील वेळ नाही. आणी हेच मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री ओरडून सांगतात हे सरकार जनतेच सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे तर मंग शेतकऱ्यांची लाईट कमी करून का चार तासावर आणली .शेतकऱ्यानं वरती आत्महत्यास प्रवृत्त का करत आहात .सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री आहेत का नाहीत जर असतील तर त्यांना भिमा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा आक्रोश का आयकायला येत नाही असा सवाल युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी विचारला आहे .
0 Comments