'जास्त ऊडऊड करू नको, केजरीवालांसारखे जेलमध्ये टाकेल.'
भाजपविरोधी भूमिका घेतलेल्या कडूंना चिठ्ठी.
अमरावती (कटूसत्य वृत्त):-'मला सभास्थळी पायी येताना कोणीतरी एक चिठ्ठी दिली. ती मी खिशात ठेवली. परंतु, ज्या वेळी ती चिठ्ठी मी वाचली त्यावेळी त्यात 'जास्त ऊडऊड करू नको, तुलाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखेच जेलमध्ये टाकेन, ' अशी धमकी निनावी चिठ्ठीत होती. यासदंर्भातील माहिती आमदार बच्चू कडू यांनी नेहरू मैदानावरील सभेत दिली. त्यानंतर सभेला संबोधित करताना “मी कोणालाही घाबरत नाही. दिव्यांगांसह सर्वसामान्यांसाठी लढा देताना माझ्याविरोधात 350 गुन्हे दाखल आहेत. चार महिने मी तुरुंगात राहिलो आहे,”कडू यांनी म्हंटले. पुढे ते म्हणाले, “115 वेळा मी रक्तदान केले आहे. लढणे, धडकणे ही माझी सवय आहे. त्यामुळे 'हटा सावन की घटा'. मी कोणालाही घाबरत नाही. आम्ही जे मागतो ते शेतकऱ्यांसाठी. तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाकावे. तेथूनही आम्ही गर्जना करत राहू,” असे कडू म्हणाले. नवनीत राणांच्या उमेदवारीला आमदार कडू यांचा विरोध दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमदार कडू यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीवरून वाद सुरू आहे. नवनीत राणांना यांच्या उमेदवारीसाठी मागील काही दिवसांपासून नाव चर्चेत तेव्हा वारंवार बच्चू कडू यांनी विरोध केला होता. परंतु असे असतानाही भाजपकडून अमरावती लोकसभा मतदार संघासाठी नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कडू यांचा रोख कुणाकडे आहे हे पाहावे लागणार आहे.
0 Comments