राम मंदिर आणि हिंदुत्व हे मुद्दे जनतेच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाहीत.
मुंबई(कटूसत्य वृत्त):- निवडणुका आल्यावर मोठ्या प्रमाणावर सर्व्हे सुरू होतात. आतापर्यंतच्या अनेक सर्वेक्षणांमधून एनडीए आणि नरेंद्र मोदी हेच बहुमताने विजयी होतील असेच निष्कर्ष कमी जास्त प्रमाणात समोर आले आहेत.
निवडणुकीतील प्रमुख मुद्दे काय ?
या निवडणुकीत मतदारांना कोणता मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो, हे जाणून घेण्यासाठी लोकनीती आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज (CSDS) ने एक सर्व्हे केला. या यादीत तीन महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत, ते म्हणजे बेरोजगारी, महागाई आणि विकास. विकासकामांबाबत भाजपाला मते मिळतील. मात्र, बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्याचा त्यांना फटका बसू शकतो, आणि हा पक्षासाठी चिंतेचा मुद्दा ठरू शकतो.
महागाईचा सर्वसामान्यांना फटका
देशातील वाढत्या महागाईचा 26 टक्के सहभागींनी केंद्र सरकारला दोष दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी राज्यांना जबाबदार धरले आहे. 56 टक्के लोकांनी राज्य आणि केंद्र अशा दोघांनाही यासाठी दोषी मानल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. 71 टक्के लोकांनी वस्तू महागल्याचं म्हटलं आहे. या दरवाढीचा फटका आर्थिकदृष्ट्या वंचित (76 टक्के), मुस्लिम (76 टक्के) आणि अनुसूचित जाती (75 टक्के) यांना बसल्याचा दावा करण्यात आला आहे.
बेरोजगारीवर ILO चे म्हणणे काय?
ILO च्या 2024 च्या एंप्लॉयमेंट इंडिया रिपोर्टनुसार, भारतातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढती आहे. भारतातील 83% बेरोजगार हे 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये जवळपास 27% मतदार बेरोजगारी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानतात. 2000 मध्ये बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचे प्रमाण 54.2 टक्के एवढे होते, जे 2022 मध्ये वाढून 65.7 टक्के एवढे झाले. यात 76.7 टक्के महिला आणि 62.2 टक्के पुरुष आहेत.
भाजपाचे प्रमुख निर्णय
आपल्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात प्रामुख्याने राम मंदिर, 370 कलाम रद्द, G-20 शिखर संमेलन अशा प्रमुख निर्णयांचा समावेश आहे. या सर्व्हेत मतदार या निर्णयांकडे कसं बघतात, हे देखील समोर आले आहे. मात्र, त्याचा फार काही प्रभाव पडणार नाही असे चित्र आहे. तर राम मंदिराबाबत विचारले असता 79% लोकांनी भारत हा सर्वधर्मीयांचा देश आहे, केवळ हिंदूंचाच देश नाही, असे म्हटले आहे.
0 Comments