शेटफळ मध्ये अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कीर्तनाने समाप्त
शेटफळ (कटूसत्य वृत्त):- शेटफळ मध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह काल्याच्या कीर्तनाने समाप्त करण्यात आला यावेळी काल्याचे किर्तन हरिभक्त परायण परमेश्वर गोडगे महाराज यांच्या अमृतवाणीतून संपन्न झाला यावेळी कृष्णाच्या असंख्य लीला त्यांच्या वाणीतून सांगण्यात आल्या काला म्हणजे काय काल्याचे महत्त्व काय काल्याचा प्रसाद सेवन केल्याने काय फायदा होतो आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये कशा पद्धतीने प्रत्येकाने आचरण केले पाहिजे याचे महत्त्व या कार्याच्या निमित्ताने त्यांनी कधीच केले कृष्णाच्या विविध रूपातून प्रत्येक व्यक्तीला जो आदर्शवत आचरण करण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केले काला म्हणजेच दह्याचा भाग व लाह्या ज्या पद्धतीने एकरूप होतात त्याच पद्धतीने या भगवंत रुपी नामस्मरणांमध्ये आपण एकरूप व्हावे कृष्णाच्या प्रत्येक लेले मधून आपल्या प्रत्येकाला आपले जीवन जगत असताना नवीन बोध मिळतो त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबासमवेत कशा पद्धतीने राहिले पाहिजे याच्या आचरण या माध्यमातून होते खूप आकर्षक असे काल्याचे किर्तन त्यांनी व्यक्त केले काल्याच्या महाप्रसादाचे आयोजन माजी ग्रामसेवक नवनाथ गणपत वागज सुभेदार एकनाथ गणपत वागज हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी वाघज सुनील सदाशिव भांगे रवी भांगे साहिल कोष्टी शहाजी वाघज मनोज बाबर बबन भांगे सिद्धेश्वर भांगे हरिभक्त पारायण कमलताई कांबळे बाळासाहेब भांगे यांनी परिश्रम घेतले तर मृदंगाचार्य म्हणून रोपळेचे सुपुत्र हरिभक्त परायण संतोष पाटील महाराज तर हार्मोनियम साथ महादेव माने यांनी दिली त्याचबरोबर चोपदार म्हणून कामराज भांगे यांची साथ लाभली यावेळी भीमराव खडके बबन खडके सर्जेराव भांगे बबन भांगे बंटी भांगे राजाराम वागज विठ्ठल शिंदे सुभाष वागज अर्जुन भांगे विश्वास डोंगरे दत्ता माळी बुवा आकर्षक असे मंडप सजावट रमेश माळी फुलांची सजावट नागनाथ माळी यांनी केली आकर्षक सप्ताहाचा सोहळा असंख्य अशा ग्रामस्थांच्या साक्षीने शेटफळच्या सिद्धेश्वराच्या पावन नगरीमध्ये संपन्न झाला यावेळी एम एस ई बी चे कर्मचारी तात्यासाहेब कणसे व त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर शेटफळ पोलीस स्टेशनचे हवलदार यांचेही सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले हा सोहळा महादेव मंदिर शेटफळ या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला असंख्य माता भगिनी यावेळी उपस्थित होत्या

0 Comments