Ads

Ads Area

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्वांना हवे: कुलगुरू सोलापूर विद्यापीठात तीन दिवसीय कार्यशाळेस सुरुवात

 आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सर्वांना हवे: कुलगुरू

सोलापूर विद्यापीठात तीन दिवसीय कार्यशाळेस सुरुवात

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही.  कोणत्याही ठिकाणी आपत्ती उद्भवल्यास ती कशाप्रकारे हाताळावी अथवा काय करावे, यासंदर्भात प्रत्येकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना अधिविभाग यांच्या मार्फत आयोजित 'आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास' या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, महापालिका अग्निशमन विभागाचे अधीक्षक केदारनाथ आवटे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनायक धुळप यांनी केले. 

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, जर एखाद्या शासकीय कार्यालयात आग लागल्यानंतर ती विजवण्यासाठी एका कोपऱ्यात विशेष किट असते. मात्र ती कशारीतीने हाताळावी, याचे ज्ञान प्रत्येकांना नसते. खरे तर याचे ज्ञान प्रत्येकांना माहीत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एखाद्यास हृदयविकाराचे त्रास होत असल्यास प्रथमोपचार म्हणून आपण हाताद्वारे पंपिंग करून त्यास कशा रीतीने मदत करू शकतो, याचेही ज्ञान घेणे आवश्यक आहे. अपघात घडल्यानंतर संबंधित लोकांना आपण कशा रीतीने मदत करू शकतो आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे ही समजून घेणे आवश्यक असल्याचे मत कुलगुरू प्रा. महानवर यावेळी व्यक्त केले.

डॉ. करजगी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अनेक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून समाजसेवेसाठी धडपडण्याकरिता त्यांच्यातील नेतृत्व गुण देखील विकसित होतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी आवटे यांनी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची तसेच कोणतीही आपत्ती घडल्यास कशारीतीने अग्निशमन विभाग काम करते, याची माहिती दिली.

दि. 26 ते 28 मार्च 2024 या कालावधीत सदरील कार्यशाळा विद्यापीठात पार पडणार आहे. उद्घाटनाच्या सत्रास विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा बनसोडे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास कडू यांनी मानले.


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, डॉ. मल्लिकार्जुन करजगी, केदारनाथ आवटे, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. विनायक धुळप, डॉ. विकास कडू.उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close