सिद्धेश्वर उर्फ गेदू दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरण भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन
शेटफळ(कटूसत्य वृत्त):-शेटफळ तालुका मोहोळ येथे आज सिद्धेश्वर उर्फ गेदू दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरण भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर शशिकांत वागज प्रताप भांगे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुखानंद भांगे विजय भांगे संजय भांगे शिवाजी गजेंद्र वाघज गहिनीनाथ भांगे नाना भांगे चंद्रकांत भांगे यांच्या उपस्थितीमध्ये हे रक्तदान शिबिर संपन्न झाले त्याचबरोबर हरिभक्त पारायण प्रकाश कापसे महाराज यांच्या कीर्तनाच्या आयोजन यावेळी करण्यात आले होते त्यांच्या कीर्तनातून रक्तदानाचे महत्त्व त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबावरती आलेल्या या संकटाला त्यांनी दिलेला आव्हान यामधून त्यांच्या पुढील कुटुंब सुखाचं जावो प्रत्येक देहाचा शेवट हा निश्चितपणे असतो पण या वयामध्ये आलेले हे कुटुंबातील संकट यातून विठ्ठल आणि व सिद्धेश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या पद्धतीचे सहकार्य करून हीच सदिच्छा यावेळी देण्यात आली उपस्थितांमध्ये हरिभक्त पारायण सुनील भांगे कामराज भांगे कुबेर बाबा वागज रामचंद्र थोरात दशरथ भांगे अशोक बापू भांगे असंख्य भजनी मंडळी यावेळी उपस्थित होती बरोबर बारा वाजता प्रतिमेवरती पुष्प वृष्टी करून कीर्तनाची सांगता करण्यात आली असा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा रक्तदान शिबिर व कीर्तनाने संपन्न झाला
0 Comments