माढा (कटूसत्य वृत्त):- माढा येथील महावितरणच्या कार्यालयांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून, सदर कामांची चौकशी करून तात्काळ कारवाई अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष अभिजीत साठे यांनी लेखी निवेदनातुन महावितरण कार्यालयास दिला आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून माढा उपविभागीय कार्यालयांतर्गत ठेकेदारांच्या माध्यमातून जी विद्युत रोहित्र बसविण्याची तसेच नवीन पोल उभा करणे व इतर कामे झालेली आहेत.ती नियमानुसार अपेक्षित ठिकाणी व मंजूर झालेल्या निधीप्रमाणे झालेली आहेत का? याची सखोल चौकशी करावी.या कामांत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून, याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून, योग्य ती चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर व बीले अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा माढा महावितरण कार्यालयाच्यासमोर बुधवार दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पासून माढा महावितरण कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येईल. यावेळी अभिजीत साठे, साईराज साठे, निखिल साठे, किरण थोरात, प्रथमेश साठे, अमीन नदाफ, प्रताप चवरे आदी उपस्थित होते.
.jpg)
0 Comments