सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा चौरस्त्यावर सकल
मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-मराठा आरक्षणाचा मूद्दा अत्ता पून्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठा योध्दा मनोज जंरागे याच्या उपोषणास राज्यभरातून सकल मराठा समाजा कडून पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी पाठींबा देत सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा चौरस्त्यावर आज सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको अंदोलन करण्यात आला. पण रास्तारोको अंदोलना दरम्यान एक रूग्णवाहीका त्याच रस्त्यावरून सायरन वाजवत निघाली. क्षणाचाही विचार न करता सकल मराठा समाज बांधवानी अंदोलनादरम्यान रूग्णावाहीकेला वाटकरून दिली व पून्हा आपल्या रास्तारोको अंदोलनाची सूरवात केली. दरम्यान मनोज जंरागे यांना पाठींबा म्हणून व सरकारचा लक्ष केंद्रित करण्यासाठी हा अदोलन असल्याचेही समजय पण पूढील दशा व दिशा ही मराठा समाज योद्धा मनोज जरांगे याच्या नेतृत्वाखाली ठरवली जाणार असल्याचेही काही पदाधिकाऱ्यांकडून अंदोलना दरम्यान बोललं जात आहे.

0 Comments