जरांगे पाटीलांच्या आव्हानाला प्रतिसाद नवरा नवरी देखील रास्तारोको च्या आदोलनात सहभागी
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ पंढरपूर पालखी महामार्गावर मोहोळ शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या श्रीराम मंगल कार्यालयामध्ये आज विवाह सोहळा असलेले नवरदेव प्रमोद विलास टेकळे रा. पापरी आणि प्रियांका अर्जुन मुळे रा. ढोकबाभुळगाव हे नवरा नवरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांच्याबरोबर संपूर्ण वऱ्हाडच रस्त्यावर उत्स्फूर्तपणे आले आणि या आंदोलनामध्ये सहभागी झाले.. त्यामुळे मोहोळचे रस्ता रोको आंदोलन संपूर्ण राज्यात गाजत आहे

0 Comments