वाडीकुरोलीच्या कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबला विजेतेपद
जिल्हा महिला खो-खो स्पर्धा : किरण स्पोर्ट्स उपविजेता, समृद्धी स्पोर्ट्स तृतीय
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- रायझिंग स्पोर्ट्स क्लब अजनाळे (ता. सांगोला) यांनी आयोजित केलेल्या खो खो स्पर्धेत महिला गटात वाडीकुरोलीच्या कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकाविले.मंगेवाडी (ता. सांगोला) येथील दत्तात्रय चौगुले विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी सोलापूरच्या किरण स्पोर्ट्स क्लबचा १४-१२ असा ५ मिनिटे राखून पराभव केला. सोलापूरच्या समृद्धी स्पोर्ट्स क्लबने तृतीय स्थान मिळवले. त्यांनी वाडीकुरोलीच्या वसंतराव काळे प्रशालेस हरविले.जिल्हा खोखो असोसिएशनचे निरीक्षक प्राध्यापक धोंडीराम पाटील, पंच प्रमुख प्रल्हाद जाधव, सह पंचप्रमुख अजित बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या.पारितोषिके दत्तात्रय चौगुले विद्यालयाचे अरुण कोळवले, धर्मराज कोळवले, विठ्ठल कोळवले, माडगूळकर ज्वेलर्सचे अमोल विभूते माजी राष्ट्रीय खेळाडू मयूर लाडे, छाया चौगुले यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी चंद्रकांत चौगुले, दत्तात्रय मासाळ, अमोल चौगुले, विजय पवार, तलाठी संदीप पवार, संदीप डुरे, काशीलिंग शेंबडे, विनोद येलपले, देशमुख, अतुल कोळवले आदी उपस्थित झाले. उपस्थित आमचे स्वागत आशिष कोळवले, राकेश पवार यांनी केले. रमेश येलपले व आप्पाराव धांडोरे यांनी सूत्रसंचालन केले.
या स्पर्धेतील प्रथम चार संघास १५, ११, ७ व ४ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. ही बक्षिसे आजनाळेचे सरपंच विष्णू देशमुख, विकास विद्यालय अजनाळे शिक्षक स्टाफ, केएमएस फूड्स अजनाळेचे काशीलिंग शेंबडे, राष्ट्रीय खेळाडू छाया चौगुले यांनी पुरस्कृत केली होती.

0 Comments