Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरव ,विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी कार्यालय कार्यान्वित

 गुरव ,विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी कार्यालय

 कार्यान्वित


सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत गुरव समाजाच्या सर्वागीण  व आर्थिक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाने स्थापना केली असून, सोलापूर जिल्हा स्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आले आहे.

शासनाने राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील जास्ती-जास्त गरजू व पात्र व्यक्तींना शासमान्य योजनांचा लाभ व्हावा या हेतूने कार्यालय कार्यान्वित केली आहेत. अधिक माहितीसाठी  जिल्ह्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील समाजातील गरजू, पात्र व्यक्तींना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर, दुरध्वनी क्रं.0217-2312595 येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments