Hot Posts

6/recent/ticker-posts

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; दावे व हरकती निकाली काढण्यासाठी मुदतवाढ

 विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; दावे व हरकती निकाली काढण्यासाठी

 मुदतवाढ

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. कार्यक्रमानुसार  निवडणूक आयोगाने निर्धारीत दावे व हरकती  निकाली काढण्यासाठी शुक्रवार  दि. 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती  उपजिल्हा निडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.

सुधारित वेळापत्रक:- दावे व हरकती शुक्रवार  दिनांक 12 जानेवारी 2024 पर्यंत निकाली काढणे,  बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 पर्यंत मतदार यादीची तपासणी आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे व  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे. तर अंतिम मतदार यादी  प्रसिध्दी सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी करण्यात येईल.


Reactions

Post a Comment

0 Comments