Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्यावरील अन्यायाविरोधात जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने धरणे आंदोलन

 ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्यावरील अन्यायाविरोधात

 जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने धरणे आंदोलन

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून थंडावलेल्या ग्रंथालय चळवळीला उर्जिता अवस्था देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांना शासनाने चुकीच्या माहितीचा आधार घेऊन  कारवाई केली आहे.  चूकीची माहीती देणारावर कारवाई करून नि:पक्षपाती चौकशी करण्याची मागणी ग्रंथालय चळवळीचे जेष्ठ नेते तथा ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केली आहे.सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाप्रसंगी मोरे बोलत होते. 

यावेळी ग्रंथालय संघाच्या अनेक ग्रंथालय चळवळीतील सहकाऱ्यांनी संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची गरज असल्याचे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. त्याच धर्तीवर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ सक्षम आणि मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांना काही विघ्न संतोषी मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी द्वेष भावनेतून कटकारस्थान करून चुकीची माहिती पुरवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे म्हणाले की, सर्व चुकीची माहिती देणाऱ्या विरोधात जिल्हा ग्रंथालय चळवळीतील सहकारी रस्त्यावर उतरले असून येणाऱ्या काळात ही लढाई रस्त्यावर तर सुरू राहीलच परंतु न्यायालयीन लढाई लढण्यास ही आपण तयारी सुरू केली पाहीजे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्याप्रमाणे तुकाराम मुंडे यांनी भ्रष्टाचाराला तिलांजली देत ज्याप्रमाणे काम उभा केले. अगदी तशाच प्रकारे ग्रंथालय चळवळ पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे असेच झुंज द्यावी. 

यावेळी ज्योतीराम गायकवाड, प्रमोद बेरे, प्रकाश शिंदे ,अनसर शेख, अँड. संगीता कुमठेकर,दिलीप भोसले,वृषाली हजारे, पद्मिनी मस्के,  आदी मान्यवरांनी आपल्या भावना प्रकट करून अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. यावेळी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीतील दत्तात्रय बाबर,  गोविंदे, सारिका मोरे, सारिका माडीकर, धोंडिबा बंडगर, अमर कुलकर्णी, संजय सरगर, विनोद गायकवाड,  यादव, जोतिराम गायकवाड, ज्योतिराम चांगभले, राजश्री माशाळ, नंदा कुर्ले, मैनाबाई साळुंके, इत्यादीसह बहुसंख्य ग्रंथपाल आणि ग्रंथमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments