Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी आश्रम शाळेतील माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

 टेंभुर्णी आश्रम शाळेतील माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-संत रोहिदास आश्रम शाळा व जय तुळजाभवानी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा यामध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामध्ये सन 2021 22 मध्ये झालेल्या परीक्षेत दिपाली दत्तात्रय लंगोटे दुय्यक निबंध श्रेणी -1 संतोष तानाजी ढेरे राज्य कर निरीक्षक अमृता अभिमान ढवळे दुय्यम निबंधक -श्रेणी-1, व राज्यकर निरीक्षक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे हे सर्व विद्यार्थी आश्रम शाळेतील गुणवंत विद्यार्थी असल्याने या विद्यार्थ्यांचा सत्कार मनीषा फुले  सहायक संचालक इतर मागास वर्ग बहुजन कल्याण अधिकारी सोलापूर यांच्या हस्ते व कैलास सातपुते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत तसेच माननीय मुख्याध्यापक गवळी व आगावणे यांच्या समवेत सत्कार करण्यात आला या उत्तुंग यशाचे हे तिने विद्यार्थी क्लास वन वर्ग एक अधिकारी हे आश्रम शाळेतील आहेत त्यांनी हे यश कठीण परिश्रमाने मिळवलेले आहे याचा मला अभिमान वाटतो असे सत्कार प्रसंगी मनीषा फुले यांनी समाधान व्यक्त केले प्रास्ताविक  धनाजी तनपुरे सर यांनी केले तसेच अभिनंदन पर भाषण तांबे ,वागज  ,शेलार  यांनी केले तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सातपुते मुख्याध्यापक गवळी मुख्याध्यापक आगावणे तांबे वागज यांनी केले आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अभिनंदन केले कार्यक्रमाचे आभार भगत यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments