Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा कोळी महादेव जमातीचे वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन

  सोलापूर जिल्हा कोळी महादेव कोळी जमातीचे वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जळगांव जिल्हाधिकारी कार्यालया समोर १०/१०/२०२३ पासून कोळी महादेव, मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी समाज बांधवांचे “अन्नत्याग सत्याग्रह” आंदोलन चालू आहे. आज २५ वा दिवस आहे. सरकारने याची हवी तशी दखल घेतली नाही म्हणून सोलापूर जिल्हा कोळी महादेव जमातीचे वतीने जळगांव समाजबांधवांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनच्या निमित्ताने सरकारकडे खालील प्रमाणे आम्ही मागणी करण्यात आल्या

प्रमुख मागण्या :-

१) जन गणन आयोगाचे आदेशाने झालेल्या कोळी नोंदी हेच कोळी महादेव कोळी,
कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी आहेत. त्यामुळे कोळी नोंद असेल तरी
त्यांना अनु.जमातीचे प्रमाणपत्र सुलभपणे दयावे.
२) शालेय नोंद शिवाय अन्य महसुली नोंदी, वतन जमीनीचे कागदपत्र, गाव कामगार
(कोतवालकी) केल्याचे कागदपत्र, खाजरा रिपोर्ट, ३६-अ च्या महसुली नोंदी
याशिवाय चालिरिती व्यवसाय यांची देखील खातरजमा करुन जात प्रमाणपत्र
मिळावे.
३) सन १९५० पुर्वीचा जमात नोंद पुरावा न मागता वास्तव्याचा पुरावा ग्राहय धरुन
जमातीचे प्रमाणपत्र दयावे.
४) जात प्रमाणपत्र कुटूंबासाठी एकच देण्याबाबत नियम करावा.
५) कुटूंबात एक जरी जात प्रमाणपत्र असेल तर इतर सदस्य यांना विना कागदपत्र न
जोडता जात प्रमाणपत्र मिळावे.
Reactions

Post a Comment

0 Comments