Hot Posts

6/recent/ticker-posts

आरक्षाणासाठी वाशिंबे येथे मराठ्यांचा एल्गार; जरांगे-पाटिल यांच्या समर्थात कॅन्डल मार्च

 आरक्षाणासाठी वाशिंबे येथे मराठ्यांचा एल्गार; 

जरांगे-पाटिल यांच्या समर्थात कॅन्डल मार्च


 
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ वाशिंबे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज याच्यां पुतळ्यास अभिवादन करुन कॅंन्डल मार्च काढण्यात आला.

मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र जोपर्यंत दिले जात नाही,तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळींना गावांमध्ये प्रवेश बंदीचा निर्णय करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे ग्रामसभेत घेतला गेला आहे. याबाबत करमाळा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
मराठा कुणबी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रभर वातावरण तापू लागले असतानाच वाशिंबे सकल मराठा समाजाने मराठा आरक्षण योद्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा कुणबी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत सकल मराठा बांधवांनी गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला.या मोर्चामध्ये सकल मराठा समाज युवक,माता-भगिंनीसह लहान मुलांनी पुढाकार घेतला होता.

मराठा समाज हा कुणबी असल्याचे हजारों पुरावे आरक्षण समितींच्या हाती लागले आहेत.तरीही समितीला  मुदतवाढ देवून मराठा कुणबी समाजाची सरकार दिशाभूल करीत आहे.ओबीसी प्रवर्गासाठी स्थापित मंडळ आयोगाने ज्या समाजाचा ओबीसी मध्ये समावेश केला आहे, त्याच्या मुळ शिफारसी प्रसिद्ध कराव्यात.मंडळ आयोगाने ओबीसी साठी किती टक्के आरक्षण दिले आहे. ते ‌सरकारने जाहीर करावे. त्यामध्ये मराठा कुणबी या समाजाची नोंद असताना आतापर्यंत ‌डावलले आहे.असे मत वाशिंबे मराठा तरूणांनी व्यक्त केले.

 शासनाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने ता.२ सकाळी मोर्चा काढून सर्वच राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बोर्ड लावण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने "एक मराठा... लाख मराठा" तुमचं आमचं नातं काय...जय जिजाऊ जय शिवराय...अशा घोषणा देण्यात आल्या.त्यामुळे संपूर्ण परिसर परिसर दणाणून गेला.मराठा आरक्षण यावरती मराठा मुलींची अतिशय आक्रमक सुंदर भाषणे झाली. मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या  मागे भक्कम उभे राहू हा विश्वास समाजाच्या वतीने व्यक्त केला गेला.यावेळी मोठ्या संख्येंने सकल मराठा समाज उपस्थित होता.
Reactions

Post a Comment

0 Comments