Hot Posts

6/recent/ticker-posts

"चलो कुछ अच्छा करते है" चा तालुकावासियांना आला प्रत्यय

 "चलो कुछ अच्छा करते है" चा तालुकावासियांना आला प्रत्यय

तहसीलदार सचिन मुळीक यांची संवेदनशीलता आणि संपूर्ण प्रशासनाची सजगता

 मोहोळ (कटूसत्य वृत्त):-अधिकारी संवेदनशील भावनेने काम करणारे असले की कर्मचाऱ्यांमध्ये देखील सजगता येते याचा प्रत्यय मोहोळ तालुकावासियांना आज मोहोळ चे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या एका उपक्रमावरून आज आला.गेल्या दोन वर्षापासून थकीत असलेले शासकीय मुलींच्या वस्तीगृहाचे वीज बिलबिल मोहोळचे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून भरण्याची अभिनव संकल्पना मोहोळचे नुतन तहसीलदार सचिन मुळीक यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यां समोर मांडली. त्यांची ही संकल्पना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मनापासून भावली. त्यातून सर्वांनी एकमुखाने आणि एकदिलाने समाजऋण जपण्याचा प्रयत्न म्हणुन ५३३७० हजार रक्कम संकलित करून ती महावितरणच्या बिलापोटी संबंधित प्रशासनाला सुपूर्द केली.

मोहोळ महसूल प्रशासनाच्या या जनहिताच्या उपक्रमाबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

Reactions

Post a Comment

0 Comments