मिरज रोड भुयारी रेल्वे मार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण :- शहीद अशोक कामटे संघटना. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 8, 2023

मिरज रोड भुयारी रेल्वे मार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण :- शहीद अशोक कामटे संघटना.

 मिरज रोड भुयारी रेल्वे मार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा खड्ड्यात

 वृक्षारोपण  :- शहीद अशोक कामटे संघटना.


सांगोला  (कटूसत्य वृत्त):-सांगोल्यातील मिरज रेल्वे गेट क्रमांक(32A)  परिसरातील भुयारी मार्ग येथील सांडपाणी व रस्त्याची दुरावस्था दुरुस्त करा व या ठिकाणी पथदिवे बसवावेत अशा आशयाचे पत्र शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले.या मार्गात रेल्वे पुलाखालून सातत्याने होत असलेली पाण्याची गळतीमुळे या ठिकाणी सातत्याने लहान- मोठे अपघात दररोज घडतात त्याचबरोबर येणारा जाणाऱ्या दुचाकी स्वारावर पाणी पूर्णपणे उलट दिशेने येत असल्याने दररोज गेल्या दोन महिन्यांपासून वादावादीचे प्रकार नागरिकात घडत आहे . त्याचबरोबर संध्याकाळी या ठिकाणी पूर्णपणे अंधार असल्याने पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला स्वतंत्र पथदिवे बसवावेत.हे सर्व थांबवण्याकरता आवश्यकता त्या उपायोजना करावे .या भुयारी मार्ग सुरू झाल्यापासून वारंवार समस्या निर्माण होत आहेत, परिणामी पावसाळ्यात या भागातील अनेक नागरिकांची गैरसोय प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत .मिरज रोड परिसरात एमायडिसी, सूतगिरणी ,अनेक मोठे उद्योग समूह ,शाळा कॉलेजेस आहेत ,येथे जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मिरज रोड भुयारी रेल्वे मार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण  :- शहीद अशोक कामटे संघटना.

सांगोला  (कटूसत्य वृत्त):-सांगोल्यातील मिरज रेल्वे गेट क्रमांक(32A)  परिसरातील भुयारी मार्ग येथील सांडपाणी व रस्त्याची दुरावस्था दुरुस्त करा व या ठिकाणी पथदिवे बसवावेत अशा आशयाचे पत्र शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले.या मार्गात रेल्वे पुलाखालून सातत्याने होत असलेली पाण्याची गळतीमुळे या ठिकाणी सातत्याने लहान- मोठे अपघात दररोज घडतात त्याचबरोबर येणारा जाणाऱ्या दुचाकी स्वारावर पाणी पूर्णपणे उलट दिशेने येत असल्याने दररोज गेल्या दोन महिन्यांपासून वादावादीचे प्रकार नागरिकात घडत आहे . त्याचबरोबर संध्याकाळी या ठिकाणी पूर्णपणे अंधार असल्याने पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला स्वतंत्र पथदिवे बसवावेत.हे सर्व थांबवण्याकरता आवश्यकता त्या उपायोजना करावे .या भुयारी मार्ग सुरू झाल्यापासून वारंवार समस्या निर्माण होत आहेत, परिणामी पावसाळ्यात या भागातील अनेक नागरिकांची गैरसोय प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत .मिरज रोड परिसरात एमायडिसी, सूतगिरणी ,अनेक मोठे उद्योग समूह ,शाळा कॉलेजेस आहेत ,येथे जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages