महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचे अध्यक्ष श्री विश्वास ठाकूर यांची मनोरमा बँकेस सदिच्छा भेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-येथील मनोरमा बँकेस महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचे अध्यक्ष , नाशिक यांनी बुधवारी (ता. 22) सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत नाशिक बँकेचे संचालक राजेंद्र नाना सूर्यवंशी व मंगेश पंचाक्षरी, सोलापूर बँक असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लुनावत आदी उपस्थित होते. यावेळी मनोरमा बँकेचे चेअरमन मा. श्रीकांत मोरे साहेब यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौ. शोभा मोरे मॅडम, व्हा. चेअरमन संतोष सुरवसे सर, कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड मॅडम, संचालक गजेंद्र साळुंके, . सुहास भोसले,मोहन गायकवाड, बँक असोसिएशनचे सीईओ शुभांगी ढवळे, दिनकर देशमुख यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
सौ. अस्मिता गायकवाड मॅडम यांनी स्वागत केले. सौ. शोभा मोरे मॅडम यांनी प्रास्ताविक केले. व्हा.चेअरमन संतोष सुरवसे यांनी आभार मानले.
0 Comments