Hot Posts

6/recent/ticker-posts

दूध दर वाढीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने दुग्धविकास मंत्र्यांना निवेदन.. *"दुध ऊत्पादक शेतकरी गावांगावामध्ये दुध संकलन केंद्रासमोर दुध दरपत्रकाची होळी करणार"*

 दूध दर वाढीसाठी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने दुग्धविकास मंत्र्यांना

 निवेदन.दुध ऊत्पादक शेतकरी गावांगावामध्ये दुध संकलन केंद्रासमोर दुध

 दरपत्रकाची होळी करणार


 टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- राज्यातील गाईच्या व म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. उत्पादन खर्च आणि दुधाचा भाव यामध्ये खूप मोठी तफावत असल्याने दूध धंदा शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरत आहे. याबाबतचे निवेदन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व दुग्ध व पशु संवर्धन आयुक्त तुकाराम मुंडे यांचेकडे  रयत क्रांती संघटनेचे संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील यांनी दिले. सध्या दुधाला ३/५ फॅट व ८/५ एस. एन. एफ ला प्रति लिटर २५ ते २६ रुपये पर्यंत कमी दर मिळत आहेत.१४ जुलै २०२३ मधील शासन निर्णयानुसार दुधाला ३४ रुपये प्रति लिटर हमीभाव देण्याचे ठरलेले होते.परंतु  सध्या खाजगी दूध संघ व सहकारी दूध संघांनी त्यादर पत्रकाला केराची टोपली दाखवली आहे. सध्या खाजगी दूध व सहकारी दूध संघांनी २५ ते २८ रुपये दराने दूध खरेदी सुरू केली आहे.पशुखाद्याचे वाढलेले दर,कमी पर्जन्यमानामुळे वैरणीची टंचाई यामुळे दुग्ध व्यवसाय तोट्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.या निवेदनामध्ये ३/५ फॅट व ८/५ एस एन एफ ला प्रति लिटर ३४ रुपये दराचा हमीभाव प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. पशुखाद्यांच्या दरावर नियंत्रण ठेवून ३० टक्क्यांनी पशुखाद्यांचे दर कमी केले पाहिजेत. राज्याबाहेरील दूध संघांचा व महाराष्ट्रातील दूध संघांचा दूध खरेदी दरामध्ये तफावत असता कामा नये. दुधाला प्रति लिटर ८ रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात यावी. दुधाचे रिव्हर्स कमी प्रत दर एक पॉईंटला एक रुपया कमी ऐवजी २० पैसे प्रति लिटर कमी दर करण्यात यावा. दूध भेसळ करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित दूध संघ दूध संस्था काळ्या यादीत टाकण्यात याव्यात. दुधाळ जनावरांचा एक रुपयांमध्ये पशू विमा काढण्यात यावा. दूध गुणवत्ता तपासणी यंत्र मिल्को मिटर सरकारकडून प्रमाणित करून देण्यात यावेत. दुधामधील भेसळ रोखण्यासाठी भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यांची पथके नियुक्त करून दूध भेसळ नियंत्रणात आणावी. लंम्पी रोगाने मृत्यू पावलेल्या जनावरांचा पशू विमा अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यांना पशु विमा तातडीने मिळण्यात यावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व दुग्ध व पशु संवर्धंन आयुक्त तुकाराम मुंडे यांना देण्यात आले यावेळी रयत क्रांती संघटनेचे  राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले, पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, भंडीशेगावचे अमोल पवार, मंगळवेढ्याचे विक्रम वाडेकर आदी जण उपस्थित होते.दूध दराच्या संदर्भातील बैठकीमध्ये सरकारकडून कोणताच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आला. शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय हा संकटात सापडलेला आहे.या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले. *चौकट*- सध्या दुधाचे दर खुपच कमी झाल्यामुळे राज्यातील दुध ऊत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे.१४ जुलै २०२३ ला सरकारने दुधाला प्रतिलिटर ३४ रूपये हमीभाव ठरवुन दिला.राज्यातील खाजगी व सहकारी दुध संघांनी शासन निर्णयाची अमंलबजावणी केली नाही.म्हणून दुधाचे दर कमी झाले.तरी राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील दुध ऊत्पादक शेतकर्‍यांनी दुध दरपत्रकाची गावोगावी दुध संकलन केंद्रावर होळी करावी.व दुध ऊत्पादक शेतकर्‍यांनी निषेध नोंदवावा. प्रा.सुहास पाटील-समन्वयक-जिल्हा दुध दर संघर्ष समिती.
Reactions

Post a Comment

0 Comments