माळशिरस तालुक्यातील संगम येथील भीमा नदीवरील जलसेतूला सहा महिन्यात दुसऱ्यांदा भगदाड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 8, 2023

माळशिरस तालुक्यातील संगम येथील भीमा नदीवरील जलसेतूला सहा महिन्यात दुसऱ्यांदा भगदाड

 माळशिरस तालुक्यातील संगम येथील भीमा नदीवरील जलसेतूला सहा महिन्यात दुसऱ्यांदा भगदाड 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उजनी उजव्या कालव्याच्या माळशिरस तालुक्यातील संगम येथील भीमा नदीवरील जलसेतूला सहा महिन्यात दुसऱ्यांदा भगदाड पडले. ३०० क्युसेकने तीस तास पाणी वाहत होते. त्यातून सुमारे ९४ कोटी लिटर पाणी वाया गेले. लगतच्या ६ एकर शेतीचे नुकसान झाले. उजनी प्रकल्प अभियंता कल्याणराव देशमुख यांनी जलसेतूमधून १५ ते २० क्युसेकने पाणी वाहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुमारे २५ लाख लिटर पाणी वाया गेल्याचा त्यांचा अंदाज आहे. जलसेतूद्वारे उजनीतून ९६० क्युसेकने विसर्ग सुरू होता. रात्री गळती लागल्याचे समजताच पाणी बंद करण्यात आले. मंगळवारी पाणी वाहात होते. बुधवारी सकाळपर्यंत पाणी वाहत राहील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सहा महिन्यांत दुसऱ्यांदा जलसेतूचे रबर जीर्ण झाल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी मेमध्ये याच जलसेतूला याच ठिकाणी रबर तुटून भगदाड पडले होते.

पाणी थांबताच रबर बसवू ,

 या जलसेतूला वापरलेले रबर जुने झाले आहेत. त्यामुळे पाण्याच्या दाबामुळे होणाऱ्या कंपणाने रबर तुटतात. कालवा फुटल्याचे समजताच हा विसर्ग बंद केला असून, पाणी पूर्ण बंद होताच त्याठिकाणी दुसरी रबर तातडीने बसवली जाणार आहे. रबर गुजरातमध्ये मिळते. ती आणण्याची सकाळीच सोय केली आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होऊन पूर्ववत होईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages