महार वतनदार परिषदेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त 27 नोव्हेंबरला
अस्थिविहार प्रांगणामध्ये व्याख्यानाचे आयोजन....!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): - सालाबाद प्रमाणे यंदाही 26 नोव्हेंबर 2023 संविधान दिनानिमित्त संविधान वाचन आणि 27 नोव्हेंबर 2023 दिनी महार वतनदार परिषदेचा 96 वा वर्षपूर्ती सोहळा निमित्त प्राध्यापक डॉ. सारीपुत्र तुपेरे यांचे व्याख्यान शिबिर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष देविदास बाबरे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना बाबरे म्हणाले की, " सालाबाद प्रमाणे यावर्षीही 26 नोव्हेंबर 2023 संविधान दिन आणि संविधान दिनानिमित्त संविधान वाचन सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी विद्यार्थ्यांना संविधान दिन व संविधान दिनाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे.
त्याचबरोबर 27 नोव्हेंबर 2023 दिनी महार वतनदार परिषदेचा वर्षपूर्ती सोहळा थाटामाटातसाजरा होणार असून यावेळी सायंकाळी ठीक सहा वाजता" संवाद आणि आठवणीचा उजाळा" या विषयावर प्राध्यापक डॉ. सारीपुत्र तुपेरे यांचे भव्य व्याख्यान होणार आहे.
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पंचाच्या चावडी चा इतिहास व 1927 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या महार वतन परिषदेतील आठवणी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार याविषयी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती समस्त महार वतनदार ट्रस्टच्या वतीने देण्यात येणार आहे तरी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन थोरला महारवाडा समस्त वतनदार मंडळ सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रांगण मिलिंद नगर बुधवार पेठ ,सोलापूर येथे होत आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ट्रस्टी अध्यक्ष देविदास बाबरे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ सरवदे, ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, उत्तर सोलापूरचे माजी तहसीलदार बी .के .तळभंडारे, ज्येष्ठ वतनदार उत्तम आबुटे, ज्येष्ठमध नागनाथ सरवदे आदी उपस्थित राहणार असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम नागरिक आणि भीमसैनिकांनी या वैचारिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला सुभान बनसोडे, शशी तळमहिते, संजय बाबरे, श्रीनिवास सरवदे, अर्निकेत आबुटे, अजित सरवदे ,शिवम सोनकांबळे उपस्थित होते.
0 Comments