भाग्यश्री शिंदे स्कुटी पटकावुन ठरल्या माढ्याच्या होममिनीस्टर,उपविजेत्या महिलांना ही पारितोषिके
जय भवानी गणेश मंडळाचे आयोजन, माढ्याच्या होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद
माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील जय भवानी गणेश सांस्कृतिक सामाजिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या "माढा होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमास महिलांनी मोठा प्रतिसाद दर्शवला.
माढ्यातील भाग्यश्री शिंदे(रा.शिवाजीनगर माढा) यांनी या स्पर्धेतील पहिले बक्षीस "इलेक्ट्रिकल स्कुटी"पटकावुन त्या "माढ्याच्या होममिनीस्टर" ठरल्या.
सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांनी आपल्या खास विनोदी शैलीत निवेदन करण्या बरोबरच महिलांचे मनोरंजनात्मक खेळ घेतले.बालगायक सह्याद्री मळेगावकर व क्रांती मळेगावकर यांनी हिंदी मराठी गिताचे सादरीकरण केले.चार तास चाललेल्या कार्यक्रमास माढा शहरासह परिसरातील गावातील महिलांनी उत्स्फुर्तपणे गर्दी केली होती.कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी जि.प.सदस्य झुंजार भांगे,नगरसेविका संजिवनी भांगे,आनंद भांगे यांचेसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह,नव विवाहीत महिला,ज्येष्ठ महिलांचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.यात महिलांनी आपले कौशल्य दाखवले.वयोवृद्ध महिला हिंदी मराठी गितावर थिरकल्याचे पहायला मिळाले.उत्कृष्ट पणे खेळ खेळलेल्या महिलांना मंडळाकडुन "पैठणी"साडी भेट देण्यात आली.यावेळी ६ विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिग्विजय कदम,उपाध्यक्ष विक्रांत भांगे,खजिनदार सुयश मस्के,सचिव राम सस्ते यांचेसह मंडळाचे सर्व पदाधिकारी शहरातील महिला नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
या सहा महिला ठरल्या विजेत्या- भाग्यश्री शिंदे( इलेक्ट्रॉनिक स्कुटी -प्रथम),सुनिता अनिल राऊत(द्वितीय-फ्रीज),भाग्यश्री विलास जाधव(तृतीय-फ्रीज),रेश्मा भास्कर गव्हाणे( चतुर्थ-पाणी फिल्टर),अर्चना लोखंडे(पाचवे-कुकर),अर्चना किरण राऊत(सहावे-सोन्याची नथ)
.jpg)
0 Comments