लोकमंगल रेडिओ भूमीचा जनजागृती कार्यक्रम
वडाळा (कटूसत्य वृत्त):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित व श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालय आयोजित रेडिओ जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम लोकमंगल सामुदायिक रेडिओ स्टेशन रेडिओ भूमी 90.4 एफएम वडाळाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. सदरील कार्यक्रम दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाठी व नान्नज येथे पथनाट्यच्या माध्यमातून सादर करून पार पाडण्यात आला. सामुदायिक रेडिओ हे जनसमुदायातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना महिलांना पुरुषांना विद्यार्थ्यांना त्यांच्यात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले लोकमंगल रेडिओ भूमी सामुदायिक रेडिओ स्टेशन यांच्यावतीने रेडिओ बद्दल जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. तृप्ती राठोड यांनी विद्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना सामुदायिक रेडिओची माहिती दिली व रेडिओ भूमी आर जे रश्मी मोहोळकर व मंजुषा यांनी विद्यार्थी व गावकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्यामध्ये रेडिओ बद्दल जाणीव निर्माण केली. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे तसेच लोकमंगल कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ. सचिन फुगे व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य गोसावी यांनी सहकार्य केले.

0 Comments