Hot Posts

6/recent/ticker-posts

डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन

 डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन


सोलापुर (कटूसत्य वृत्त):- डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन संघटनेच्यावतीने  जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन केल्याची माहीती जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे व शहराध्यक्ष अनिल गायकवाड यांनी दिली.
    स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष आहे.स्पर्धा चार गटात आयोजित करण्यात आली आहे.गट पहिला — १ली व २ री, गट दुसरा—३री व ४ थी,गट तिसरा—५वी,व ६वी,गट चौथा—७वी व ८ वी.प्रत्येक गटातुन प्रथम,द्वितीय,तृतीय व दोन उत्तेजनार्थ अशी एकुण पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेची अंतिम नाव नोंदणी दिनांक ६ आक्टोंबर आहे.नाव नोंदणीसाठी सप्तर्षी ग्राफिक्स,घोंगडे वस्ती सोलापुर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संतोष माशाळे यांनी केले आहे.स्पर्धेत जास्तीत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन  दिपक डांगे,विशाल काळे,समीर शेख,शाम कदम,सिद्धेश्वर पवार,प्रकाश बाळगे,प्रदीप सातपुते,वजीर शेख,हणमंत भोसले,नितीन भांगे,धन्यकुमार स्वामी व विशाल पवार  यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments