Ads

Ads Area

आयसीआयसीआय लोम्बार्डकडून 'क्लाउड कॉलिंग' आविष्काराचे अनावरण , वाहन विमा दाव्यांसाठीच्या आंतरसंवाद पध्दतीत बदल आणि दाव्यांच्या पुर्ततेला गती

 आयसीआयसीआय लोम्बार्डकडून 'क्लाउड कॉलिंग' आविष्काराचे अनावरण , वाहन विमा दाव्यांसाठीच्या आंतरसंवाद पध्दतीत बदल आणि दाव्यांच्या पुर्ततेला गती

मुंबई, (कटूसत्य वृत्त):- भारतातील आघाडीच्या खासगी जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डने "क्लाउड कॉलिंग" या आपल्या नवीनतम तांत्रिक आविष्काराचे अनावरण केले आहे. वाहन विमा दाव्यांच्या प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव प्रदान करताना दाव्यांचा निपटारा जलद गतीने करून ग्राहक संवादाला नवा आयाम देण्यासाठी हा अद्वितीय आविष्कार तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या मौल्यवान ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या आयसीआयसीआय लोम्बार्डच्या वचनबद्धतेलाही हा आविष्कार अधोरेखित करतो.


दाव्यांचे व्यवस्थापन आणि ते निकाली काढणे यात "क्लाउड कॉलिंग" ने आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. पारंपारिक प्रक्रियेत, ग्राहक सेवा व्यवस्थापक (सीएसएम) आणि ग्राहक यांच्यात अनेकदा दूरध्वनीव्दारे संवाद केला जात असे आणि या प्रक्रियेत बराचला विलंब होत असे, तसेच कामकाजात अकार्यक्षमतासध्दा निर्माण होत असे. हे आव्हान ओळखत,

निर्बंधमुक्त आणि कार्यक्षम संवादासाठी समर्पित आभासी क्रमांक प्रदान करत ग्राहक आणि सेवा व्यवस्थापक या दोघांना आयसीआयसीआय लोम्बार्डने सक्षम बनविले आहे.  या अनोख्या वैशिष्ट्यामुळे दाव्यांचा प्रवास सहजसोपा, पारदर्शक आणि सु-समन्वित प्रक्रियेत बदलला गेला आहे. परिणामी ग्राहकांची समाधानपुर्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे.

कंपनीचा हा नवीन आविष्कार बहुस्तरीय आहे आणि तो संपूर्ण दाव्यांच्या जीवनचक्राचा समावेश असणारे अनेक फायदे प्रदान करतो. ग्राहक सेवा व्यवस्थापकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहकांकडे आता एक विशिष्ट संपर्क क्रमांक असल्याने दोघांतील संवादाची सुलभता वाढली आहे. सर्वसमावेशक कॉल ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मसह कॉल कनेक्टिव्हिटी ही अतिशय सुरळितपणे कार्यरत राहते. त्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी वाढली आहे. जर ग्राहक सेवा व्यवस्थापक अन्य ग्राहकांशी बोलत असेल तर आभासी क्रमांक अन्य संबंधित व्यवस्थापकाकडे ग्राहकाचा कॉल आपोआप हस्तांतरीत करतो. त्यामुळे ग्राहकांचे निवारण अपूर्ण राहत नाही, याची खात्री हा 'क्लाउड कॉलिंग' आविष्कार देतो. याशिवाय, कॉल रेकॉर्डींग, विश्लेषणासाठी परिपूर्ण माहिती प्रदान करणे आणि ग्राहकांबरोबरील संवादप्रक्रियेत सातत्याने सुधारणा करत राहणे, ही अतिरिक्त वैशिष्टे 'क्लाउड कॉलिंग' मध्ये समाविष्ट आहेत.

'क्लाउड कॉलिंग' बद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डच्या अंडररायटींग आणि क्लेम्स प्रॉपर्टी व कॅज्युल्टी विभागाचे प्रमुख श्री. गौरव अरोरा म्हणाले, “पारंपारिक उद्योग विश्वातील बदलत्या स्थितीत, ग्राहक दाव्यांच्या प्रवासात आणि ग्राहकांच्या अनुभवाच्या वाढीवर आमचे अतिशय बारकाईने लक्ष केंद्रीत झालेले आहे. 'क्लाउड कॉलिंग' वैशिष्ट्याच्या नाविन्यपूर्ण एकत्रीकरणाद्वारे आम्ही दावे पुर्तता करणारी संस्था (क्लेम्स ओनर्स), अभियंते, व्यवस्थापक आणि ग्राहकांच्या संवादातील अडथळ्यांना दूर करणार्‍या तांत्रिक आविष्काराचा उपयोग करण्यासाठी दृढपणे वचनबद्ध आहोत. त्यामुळे दाव्यांचा जलद गतीने आणि अधिकाधिक प्रमाणात निपटारा होत आहे.”

'क्लाउड कॉलिंग' च्या वापरापासून या नवीन आविष्काराने चार लाख ग्राहक जोडले गेले आहेत. तसेच त्यांना तत्काळ मदत आणि सहाय्य प्रदान केले जात आहे. आत्तापर्यंत वाहन विमा दाव्यांच्या प्रक्रियेबाबत झालेल्या विचारणांपैकी 95 टक्के ग्राहकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आलेले आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा उद्योगांसाठी नवनवीन मापदंड निश्चित करत असल्याने हा टप्पा या नावीन्यपूर्णतेच्या परिणामकारकतेचा आणि प्रासंगिकतेचा पुरावाच ठरला आहे.

अरोरा आणखी टिप्पणी करताना पुढे म्हणाले, “एकीकडे तंत्रज्ञान कार्यक्षमता वाढत असताना, मानवी परस्परसंवादाचे सार गमावले जाऊ नये. या प्रगल्भ जाणिवेतून हा 'क्लाउड कॉलिंग' रुपी नवीन आविष्कार फुलला आहे. सुविधा आणि वैयक्तिक स्पर्श यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी आम्ही हा आविष्कार तयार केला आहे.  विमा दावे पुर्तता करणारी संस्था आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करताना 'क्लाउड कॉलिंग' केवळ दावे प्रक्रियेला गतीच देत नाही तर, मानव-केंद्रीत सेवेप्रती आमची असलेली वचनबध्दताही स्पष्ट करतो.”

"क्लाउड कॉलिंग" हे आयसीआयसीआय लोम्बार्डच्या प्रगतीशील भावनेचा पुरावा म्हणून उभे असताना, ते ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी तयार केलेल्या एका मोठ्या अर्थप्रणालीचा भाग आहे. मोबाइल स्वयं-तपासणीचे अग्रगण्य  वैशिष्ट्य असलेल्या "इन्स्टास्पेक्ट" सारख्या सेवांबरोबर जोडले गेलेले आयएल टेककेअर अॅप म्हणजे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डचा सर्वांगीण दृष्टीकोन प्रदर्शित करते. त्याचबरोबर अपवादात्मक ग्राहक सेवेच्या सर्व वैशिष्ट्यांचे पालन करून. अखंडरित्या आणि कार्यक्षम रितीने दाव्यांची निपटारा प्रक्रियेचा अनुभव देत या सेवा ग्राहकांप्रती आमचे अतुलनीय समर्पण अधोरेखित करतात.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close