Ads

Ads Area

*शिरुर व पटणे तपोरत्नं गुणवंत पुरस्कारांनी सन्मानित*

*शिरुर व पटणे तपोरत्नं गुणवंत पुरस्कारांनी सन्मानित* 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शिवकुमार शिरुर यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षक पुरस्कार तर  प्रशांत पटणे यांना तपोरत्नं गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र,शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन शिरुर व पटणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, लक्ष्मीकांत त्रिशुले, दयानंद महाविद्यालयाचे प्रा.धर्मराज कारले,मुरुम महाविद्यालयाच्या प्रा.शीला हिरेमठ, कस्तुरबा महाविद्यालयाच्या प्रा.लक्ष्मी कुरापाटी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व थोर शिक्षण तज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दयानंद महाविद्यालयाचे प्रा.विजयकुमार बिराजदार, मुख्याध्यापिका रत्नमाला उकरंडे,ज्येष्ठ लिपिक राजशेखर स्वामी आदींचा सेवानिवृत्तीनिमित्त तर प्राचार्य डॉ.राजशेखर हिरेमठ यांना सोलापूर विद्यापीठाचे आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.संस्थेतील सहशिक्षक शीतल पाटील, विठ्ठल कुंभार,भारती पाटील, शैलेश स्वामी, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांचाही विशेष कार्यानिमित्त सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह संस्थेतील १५० शिक्षकांना लेखणी व पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाचे शुभेच्छा देण्यात आले.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी हे केंद्रबिंदू असल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास होण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.सध्याच्या परिस्थितीत व स्पर्धेत नेताजी शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांचे विश्वास संपादन केल्यामुळेच  संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती झाली आहे. नेताजी शिक्षण संस्थेच्या भरभराटीत शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. यावेळी सत्कारमूर्ती मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बिराजदार व विश्वाराध्य मठपती यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मराज बळ्ळारी, विनायक कोरे, षडाक्षरी हिरेमठ, प्रकाश कोरे, बसवराज बिराजदार,प्रा.पिरप्पा अंबारे, प्रशांत बत्तुल आदींनी परिश्रम घेतले.

 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close