मराठा आरक्षणासाठी पंढरीत तरुणाचे आमरण उपोषण सुरू
जालन्यानंतर पंढरीत... उपोषणाचा पहिला दिवस
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणासाठी जालना जिल्हा येथील मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच आत्ता पंढरपूर येथे गणेश जाधव या युवकाने येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामध्ये गाव बंद आंदोलन, रस्ता रोको , निषेध मोर्चा अशा विविध प्रकारचे आक्रमक आंदोलने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुऊ आहेत हि आंदोलने नियंत्रित करताना प्रशासन व पोलिसांची दमछाक होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील गणेश जाधव हा तरुण सकल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवार दि. ८ रोजी आमरण उपोषणास बसला आहे. याबाबत त्यांनी दि. ६ रोजी त्यांनी तसे प्रशासनास निवेदन देऊ केले आहे.

0 Comments