कामती व आष्टी तलावात पाणी सोडा विजयराज डोंगरे यांची पालकमंत्री
विखे-पाटील यांच्याकडे मागणी
कुरुल (कटूसत्य वृत्त):- पावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यामध्ये शिवारातील पिकं भरपूर चालली आहेत. जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या देखील तीव्र स्वरूपात जाणवू लागली आहे. त्यामुळे शेतातील पिके आणि घरासमोरील पशुधन वाचवण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कामती व आष्टी तलावात पाणी सोडण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सोलापूर जि प अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे व भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश आवताडे यांनी जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भैय्या आवताडे, जयसिंग नाना आवताडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, विरवडे बुद्रुकचे सरपंच बाबासाहेब अंकुश, शेजबाबळगाव चे सरपंच दीपक गवळी, प्रकाश बाबा आवताडे व तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.
.png)
0 Comments