Hot Posts

6/recent/ticker-posts

फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात साजरी

 फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूलमधील चिमुकल्यांची दहीहंडी उत्साहात

 साजरी


अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील पंचवीस चार लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या मुलांनी पौराणिक वेशभूषेत करून कृष्ण जनमोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करत मनमुराद आनंद लुटला.या शाळेतील चिमुकल्या बाळगोपालानी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती तर शर्वरी शेखर रेडे या मुलीने रधिकेची वेशभूषा परिधान करून तिचा सखा कृष्णा बरोबर नृत्य सादर केले तसेच नटख्ट कृष्ण कन्ह्याची वेशभूषा परिधान केलेले प्रियांश गायकवाड,अर्जुन निखिल चव्हाण,विराट मिटकल यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.राधा कृष्णच्या वेशातील ही चिमुकली मुले अतिशय सुंदर मनमोहक दिसत होती.या बालकांच्या अंगभूत नटखट  लीलांचे दर्शन यावेळी उपस्थित पालकांना व ग्रामस्थांना पहावयास मिळाली
           दहीहंडी उत्सवामुळे  विद्यार्थ्यांना संगठन कौशल्य आत्मसात होते.संघटित राहण्याची भावना बालमनात रुजते सहकार्याची,एकमेकांना मदतीची भावना निर्माण होते आणि एकात्मतेच्या विचारांना खातपणी मिळते पारंपरिक सन उत्सवाची माहिती मिळते व आपल्या संस्कृतीची व संस्काराची जपवणूक होते.फिनिक्स इंग्लिश स्कूल ही उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण अशी आदर्श शाळा म्हणून पंचक्रोशीत नवलौकिक मिळवलेला आहे. अल्पावधीत नावारूपास आलेली ही शाळा ज्ञानार्जना सोबत बालकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन एकात्मतेचे धडे गिरवीत आजचे बालक उद्याचे आदर्श नागरिक व्हावेत यासाठी सदैव प्रयत्नशील असते.
Reactions

Post a Comment

0 Comments