आरोही कॉलेज ऑफ फार्मसी डी. फार्मसी कोर्सला फार्मसी कौन्सिल ऑफ
इंडियाची मान्यता
अहमदनगर (कटूसत्य वृत्त):- देवळाली प्रवरा व शिरूर (पुणे) येथील समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित आरोही कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली यांच्याकडून मान्यता दि.03 ऑगस्ट 2023 रोजी मिळाली असून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांची संलग्नता प्राप्त होऊन महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या डी फार्मसी प्रवेश प्रक्रिया 2023-24 करीता प्रवेश फेरी क्र.2 मध्ये समावेश 60 विद्यार्थी एवढ्या प्रवेश क्षमतेसह करण्यात आला असून शिरूर मधील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच कॉलेज मार्फत बाहेर गावातील विद्यार्थी मुला-मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहाची सुद्धा सोय केलेली आहे असे देवळाली प्रवरा गावचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब विष्णु चोळके यांची सून व डॉ. प्रविण बाळासाहेब चोळके यांच्या पत्नी तसेच आरोही कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्य डॉ. योगिता प्रविण चोळके यांनी लोकमत शी झालेले चर्चामध्ये सांगून आम्ही शिरूर (पुणे) तसेच देवळाली प्रवरा (अहमदनगर) मधील आमच्या या कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या महाविद्यालय प्रवेश घेणाऱ्या डी.फार्मसी च्या विद्यार्थी नोकरी च्या संधी सुद्धा उपलब्ध करून देणार आहे.

0 Comments