Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला आढावा

 मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला आढावा


मुंबई (कटूसत्य वृत्त):-,मुंबई शहरातील १४,००० शौचालयांची बांधकामे तातडीने करावीत, प्रतिदिन ५ वेळा शौचालय स्वच्छता करणेमुंबई महापालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये विविध सुधारणांसह सुरक्षा रक्षकांची दर्जोन्नती व मनोरंजनात्मक सुधारणा तसेच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर भेडसावणाऱ्या सार्वजनिक पार्किंग समस्येबाबत योग्य त्या परिणामकारक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेच्या नागरिक कक्ष” कार्यालयात महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहलअतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासुअतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या समवेत मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांबाबत बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

या बैठकीत मुंबईच्या विविध विभागातील रस्तागटारेकचरा व्यवस्थापनपदपथ इ. समस्यांचा आढावा  पालकमंत्र्यांनी घेतला. तसेच महापालिका शाळांचे नुतनीकरण आणि पूर्णत: वापर सुरू करणेनिवृत्तीनंतर महापालिका कर्मचाऱ्यांचे ६० दिवसांत निवृत्ती वेतन मिळवून देणेउद्यान सुधारणासार्वजनिक मनोरंजन ठिकाणे सुधारणामहानगरपालिका रुग्णालय सुधारणाआपला  दवाखाना बद्दलच्या तक्रारी आणि सूचनासार्वजनिक पार्किंग आणि इतर पार्किंग समस्या, महापालिका शाळांचे नूतनीकरण करण्याबरोबर त्यामध्ये  कौशल्य विकासअभ्यासिका व पाळणाघर या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments