रयतच्या माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या ‘छडी’चा गौरव, ‘दहावी बॅच १९९५’ चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

रयतच्या माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या ‘छडी’चा गौरव, ‘दहावी बॅच १९९५’ चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 रयतच्या माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या ‘छडी’चा गौरव, 

‘दहावी बॅच १९९५’ चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कुरुल(कटूसत्य वृत्त):-  अठ्ठावीस वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनांत अभ्यासासाठी शिक्षकांनी केलेल्या शिक्षेचा गौरव केला आहे.निमीत्त होत माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचं. कुरुल येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये बुधवारी 1995 सालच्या दहावी बॅचचं स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं.

या संमेलनाच्या सुरवातीला संयोजन समितीने माजी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. त्यानंतर रयतमाऊली लक्ष्मीबाई आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर स्व-परिचयाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी उपस्थित तत्कालीन शिक्षकांचा विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती, शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.या संमेलनाला सेवनिवृत्त शिक्षक रामकृष्ण जोशी,मधुकर काटकर, मल्लिकार्जुन बिराजदार, राजकुमार नरगिडे, प्रकाश पाटील, बळीराम गुंड आणि दत्तात्रय बोंगे यांच्यासह सेवक श्रीरंग कोंडकर, विठ्ठल पवार, पांडुरंग ननवरे, किसन राठोड,धोंडप्पा गुंडू, वसंत ताकमोगे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय शिंदे हे होते.

या स्नेहसंमेलनात प्रगतशील शेतकरी,उद्योजक, व्यावसायिक आणि शासकीय आणि खासगी क्षेत्रांत उच्चपदांवर कार्यरत विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक आयुष्याचा प्रवास मांडताना आठवणींना उजाळा दिला.मुख्याध्यापक वाय बी शिंदे, वर्गशिक्षक मारुती सपाटे,दिवंगत प्रेमसिंह पवार यांनी शालेय जीवनांत केलेल्या हलक्या-फुलक्या शिक्षांमुळं आयुष्य घडल्याचं सर्वांनी आवर्जून सांगितलं.

यावेळी नागेश तळे,वर्षा कदम-खैरे, महादेव बिडवे, सचिन दांडगे,श्रीनिवास ठोंबरे यांची लक्ष्यवेधी भाषणे झाली.

हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे समाधान बोंगे,वर्गमाॅनिटर महादेव पाटील,बाळासाहेब ताड,प्रमोद खंदारे,प्रतिभा ननवरे-लोंढे, लिनल माने-कोळी आणि उज्वला सपकाळ-जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष अंकुश यांनी केले तर रुपाराणी शिंदे-मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

▪️चौकट

यावेळी स्नेहसंमेलनांत बोलताना, वर्गशिक्षक मारुती सपाटे यांनी, आज बदललेल्या सामाजिक परिस्थितीत शिस्त, गृहपाठ, परीक्षा या निमिताने विद्यार्थ्यांना शिक्षा करायला मर्यादा आल्या आहेत.पालकांच्या पाल्यप्रेमामुळं विद्यार्थी आणि शिक्षकांतील परस्पर नात्यावर अनेक प्रश्नचिन्ह आहे. शिवाय विद्यार्थ्याला शिक्षा करायला कायद्याने बंधनं आली आहेत.त्यामुळं शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासासाठीचा दबाव उरलेला नाही.पर्यायाने विद्यार्थ्याच्या मनांत आदरयुक्त भिती नसल्याने त्याचा गुणवत्तेवर परिणाम होताना आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages