स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा
मुंबई,(कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण’ प्रतिज्ञा दिली. सन 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची व गुलामगिरीची मानसिकता दूर करण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याची, देशाची एकता मजबूत राखण्याची तसेच नागरिक म्हणून आपले कर्तव्यपालन करण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी यावेळी सर्व उपस्थितांना दिली. |
0 Comments