Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव श्री. जे. पी. डांगे यांची शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजला सदिच्छा भेट.

 महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव श्री. जे. पी. डांगे यांची शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजला सदिच्छा भेट.


सांगोला (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व महाराष्ट्र राज्याच्या ऍडमिशन रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचे चेअरमन श्री. जे.पी. डांगे यांनी सांगोला येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त श्री. एम.आर. गायकवाड व डॉ. यशोदीप गायकवाड यांनी संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार केला. श्री. जे. पी.डांगे यांनी कॉलेजची पाहणी करून कॉलेजमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व कोर्सेस व सुविधांची माहिती घेतली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. ए. देशमुख यांनी कॉलेजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीची सर्वकश माहिती श्री डांगे साहेब यांना दिले. श्री जे.पी.डांगे हे संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचे कौतुक करताना म्हणाले की सांगोला सारख्या ग्रामीण भागात सर्व सोयींनी अद्यावत असे अभियांत्रिकी कॉलेज उभा करून गायकवाड कुटुंबीयांनी या भागातील गोरगरिबांच्या मुलांचे अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांनी या शैक्षणिक संकुलात असणाऱ्या भौतिक सुविधा, कॉलेजचा उत्कृष्ट निकाल, प्लेसमेंट, त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण यावर समाधान व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की या शैक्षणिक संकुलातून येणाऱ्या काळात उत्तम दर्जाचे अभियंते बाहेर पडून समाजाच्या व देशाच्या उत्कर्षास हातभार लावतील. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कॉलेजचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments