संत बाळूमामा पुण्यतिथी निमित्त बेलाटी येथे विविध विधायक कार्यक्रमाचं आयोजन..!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील सद्गुरु संत बाळूमामा मंदिर प्रति आदमापूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं असून हे मंदिर विजयपूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील बेलाटी या ठिकाणी असून संत बाळूमामाच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी अभिषेक आणि गुलाल उधळण्याचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटी कर यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्रीराम पाटील बेलाटी कर पुढे म्हणाले की, श्री सद्गुरू संत बाळूमामा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेले आहे. दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6:00 वाजता अभिषेक सकाळी सात वाजता आरती आणि नऊ वाजता मेंढी पूजन, सकाळी 11 वाजता मंदिर परिसरात वृक्षारोपण, सकाळी 11 ते 5 रक्तदान शिबिर या विधायक उपक्रमाबरोबरच पुण्यतिथीची औचित्य साधून मंदिर परिसरात सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत भजन, कीर्तन, धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे.
संकष्ट चतुर्थी निमित्त मंदिर परिसरातील गणेश मंदिरात सायंकाळी सहा वाजता महापूजा व आरतीचा कार्यक्रम होणार असून त्याच दिवशी रविवारी दुपारी साडेबारा वाजता फुलांच्या पाकळ्या व गुलाल उधळण्याचा कार्यक्रम होणार होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता बाळूमामाच्या आरतीचा भव्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटी कर यांनी यावेळी बोलताना शेवटी दिली.
तरी या पुण्यतिथी सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान बाळूमामा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला मंदिर समितीचे सचिव श्रीकांत पाटील बेलाटी कर, सिद्राम वाघमोडे ,माजी सरपंच सुनील काटकर, मुख्याध्यापक अन्नप्पा सतुबर, शेखर बंगाळे, उमेश मळेवाडी, अरुण पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments