Hot Posts

6/recent/ticker-posts

जुनी मिल ट्रस्ट च्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड

 जुनी मिल ट्रस्ट च्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड

जुनी मीलची जागा मिळण्याबाबत सभासदांचा मार्ग मोकळा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- २७ ऑगस्ट रोजी जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती ,सोलापूर या ट्रस्टच्या तातडीच्या सभेमध्ये नवीन कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली असून अध्यक्षपदी औदुंबर आकुडे, सचिवपदी डॉ.संदीप आडके व खजिनदार म्हणून डॉ. संतोष आडके यांची सभासदांनी एकमताने निवड केली आहे.

१९८८ सालापासून ट्रस्टच्या सभासदांना जुनी मिल जागेत प्लॉट देतो म्हणून संस्थापक अध्यक्ष कुमार करजगीने फसवणूक केली होती. ट्रस्टच्या कोणत्याही सभासदास आजपर्यंत ही जागा मिळालेली नाही अथवा काही जणांना बोगस खरेदीखत करून ही जागा देण्यात आलेली होती. ट्रस्टच्या काही सभासदांनी २०१७ सालापासून हा विषय उचलून धरल्यामुळे व या नवीन स्थापन झालेल्या कार्यकारी मंडळामुळे आता सभासदांना आपल्या जागेच्या मोबदल्यापेक्षाही जास्त मोबदल्याची जागा मिळण्याची शक्यता दिसत आहे. सभेत ट्रस्टच्या हिताचे निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले आहे. संबंधित सभासदांनी ट्रस्टचे सचिव डॉ. संदीप आडके , आडके हॉस्पिटल, उत्तर सदर बाजार सोलापूर ,९८२२८०७००७ यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments