आश्रफाअली फकृद्दीन शेख आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानीत
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील आश्रफाअली फकृद्दीन शेख यास राहुरी कृषी विद्यापीठातील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव मध्ये उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करून सन्मानीत केले गेले माळशिरस तालुक्यातील गणेशगाव या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील अश्राफआली याने कृषी महाविद्यालयातील मागच्या तिन्ही वर्षात सर्वोत्कृष्ट गुण मिळवून विद्यार्थी परिषदेचे चेअरमनपद मिळवले आहे. शेतकऱ्याचा हा मुलगा कृषी अधिकारी होऊन, शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी,त्यांची आर्थिक प्रगती बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे स्वप्न उराशी बाळगून महाविद्यालयातील गुणवन्त आदर्श विद्यार्थी म्हणून आश्रफाअलीने नावलौकिक मिळवले आहे.तर त्याचे स्वप्न साकार होवो असा आशीर्वाद त्याचे आई वडील व गावकरी त्याला देत आहेत.यावेळी सोहळ्यात सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे, डॉ. सखेचंद अनारसे, डॉ.मनोज गुड आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments