अत्यंत उत्साहात पद्मशाली युवक संघटनेचे नूतन पदाधिकारी पद ग्रहण सोहळा पार पडला
पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतक महोत्सवनिमित्त यंदाच्या वर्षी शंभर कार्यक्रम घेण्याचे संकल्प

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत कुलदैवत महर्षी मार्कंडेय यांच्या नारळी पौर्णिमा रथोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने बुधवार दि.2 ऑगस्ट रोजी सिद्धेश्वर पेठ येथील महर्षी मार्कंडेय मंदिर येथे पद्मशाली युवक संघटनेचे नूतन अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांचा पद ग्रहन सोहळा पार पडला.
यावेळी पद ग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून यंदाच्या वर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतक महोत्सव निमित्ताने पद्मशाली युवक संघटनेच्या नूतन समितीच्या वतीने यावर्षी शंभर समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचे संकल्प पहिल्याच बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि.2 ऑगस्ट रोजी पदग्रहन सोहळा पार पडल्यानंतर सर्व नूतन पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गुरुनानक चौक येथील महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बेघर निवारा केंद्र येथील सर्वांसाठी अध्यक्ष तुषार जक्का यांच्या हस्ते जेवण वाटप करण्यात आले आहे.
यावेळी कार्याध्यक्ष कुमारगौरव कुडक्याल, सचिव श्रीकांत दासरी, प्रेसिडेंट मनोहर मचर्ला, उपाध्यक्ष साईनाथ मुनगापाटील, नागेश बंडी, दिनेश रिकमल्ले, बालकृष्ण मल्याळ, नागेश बोमड्याल, आकाश दुधगुंडी, श्रीकांत कटकम गोविंद राजूल, अंबादास जल्ला, अभिषेक चिंता, अविनाश शंकू, सुनिल सारंगी,नागार्जुन राहुल, नागेश म्याकल सर चिटणीस अमर येरपूल, राम कुरापाटी, रामकृष्ण ताटीपामुल,प्रविण मंदा, जगदीश वासम, प्रदिप चन्ना, शुभम एक्कलदेवी, अनिल गाजंगी, अनिल करली, हरिप्रसाद चरकुपल्ली, शिवसमर्थ गाजूला, विनय निली, रोहित वईटला, किसन कोंडा,
सह मिरवणूक प्रमुख निलेश मच्छा,अजय जक्कापल्ली, मिरवणूक प्रमुख हरिकृष्ण दुस्सा,
सहप्रसिद्धी प्रमुख बाळकृष्ण इप्पाकायल, प्रसिद्धी प्रमुख शाम आडम, सह खजिनदार संदिप श्रीचिप्पा, ओम केंजरला,खजिनदार शुभम आनंद मल्ला, कार्यकारिणी सदस्य अविनाश श्रीमल, बाळकृष्ण अन्नलदास, नवनीत कोंगारी, प्रविण पासकंटी, मोतीलाल बरेंकल, प्रकाश पोरंडला, रामकृष्ण बोगा, प्रविण जिल्ला, राहुल ताटी,सागर दासी, अनिल चिंताकिंदी, नितीन महेश्वरम, अभिषेक बोगा, शुभम द्यावनपल्ली, व्यंकटेश भंडारी, महेश येमूल, किरण कैरमकोंडा, सागर जक्कापल्ली, विनोद मुत्याल, अनिकेत कैंची,राजेश श्रीगांधी, जयप्रकाश सामल, बालाजी कैंची, प्रमोद जक्का आदींची उपस्थिती होती.
0 Comments